महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. Government Employee update

Created by satish, 22 November 2025

Government Employee Update : नमस्कार मित्रानो महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असा एक महत्त्वपूर्ण निर्णय पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. सरकारी नोकरीची स्थिरता, सुरक्षितता आणि विविध लाभ यामुळे अनेकजण या नोकरीकडे आकर्षित होतात. पगारासोबतच विविध सुविधा देण्यात येतात, त्यापैकीच एक विशेष पगारी रजा ही खास सुविधा आहे.

⭕विपश्यना शिबिरासाठी 10 दिवसांची पगारी रजा

राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा ‘विपश्यना ध्यान शिबिर’ उपस्थित राहण्यासाठी 10 दिवसांची फुल पगारी रजा मिळू शकते. ध्यान, धारणा आणि मन:शांती मिळवण्यासाठी या शिबिराचा मोठा उपयोग होतो. Government Employee News

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याला बळकटी मिळावी आणि कार्यक्षमता वाढावी, यासाठी शासनाने ही सुविधा उपलब्ध केली आहे. सरकारी सेवेत सततचा ताण, निर्णय प्रक्रियेतील जबाबदाऱ्या आणि दैनंदिन कामाचे ओझे कमी करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरते, असे शासनाने नमूद केले आहे.

हे ही वाचा :– 8व्या वेतन आयोगाला मंजुरी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

🔴22 वर्षांपासून लागू असलेला नियम

अनेकांना हे धोरण अलीकडचे वाटत असले तरी प्रत्यक्षात हा आदेश 27 जून 2003 पासून लागू आहे. म्हणजे गेल्या 22 वर्षांपासून ही सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

Read more...  ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन भेट मिळणार, ६०, ७० आणि ७५+ वयोगटातील नागरिकांसाठी मोठी बातमी. Senior Citizen update

विपश्यना रिसर्च इन्स्टिट्युट, धम्मगिरी (इगतपुरी, नाशिक) येथे होणाऱ्या 10-दिवसीय कोर्ससाठी ही रजा मंजूर केली जाते. राज्यातील विविध विभागांतील कर्मचारी ही रजा घेऊ शकतात.Government Employee update

रजेसाठी आवश्यक अटी व नियम

  • रजेची किमान मुदत 10 दिवस, तर कमाल 14 दिवस आहे.
  • ही रजा विनावैद्यकीय प्रमाणपत्र मंजूर होते.
  • मात्र, कर्मचाऱ्यांनी रजा अर्जासोबत विपश्यना केंद्राने दिलेले प्रवेशपत्र जोडणे अनिवार्य आहे.
  • ही रजा कर्मचाऱ्यांचा ‘हक्क’ नसून ‘अनुज्ञेय रजा’ आहे.
  • तीन वर्षांत एकदाच ही रजा घेता येते.
  • संपूर्ण सेवाकाळात जास्तीत जास्त सहा वेळा ही रजा घेण्याची मर्यादा आहे.

मानसिक स्वास्थ्यासाठी शासनाचा सकारात्मक उपक्रम. Government Employee News

या उपक्रमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मानसिक शांती, सकारात्मकता आणि कार्यक्षमतेत वाढ अनुभवता येते. तणावमुक्त वातावरणात काम करण्यासाठी आणि सेवेत गुणवत्ता वाढवण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते.

👉 एकूणच, महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना मानसिक स्वास्थ्याचा एक उत्तम आधार असून शासनाचा हा निर्णय कर्मचारीहिताचा आणि अत्यंत स्वागतार्ह मानला जात आहे.

Leave a Comment