पगार संरचनेत मोठा बदल, PF-ग्रॅच्युइटी वाढणार, New Labour Codes लागू

New Labour Codes :  नमस्कार मित्रानो भारत सरकारने कामगारांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून चार नवे लेबर कोड अधिकृतपणे लागू करण्यात आले आहेत. हे नियम 21 नोव्हेंबर 2025 पासून प्रभावी झाले आहेत. नव्या कायद्यांचा उद्देश श्रम कायदे सोपे करणे, कर्मचारी सुरक्षेला प्राधान्य देणे आणि सामाजिक सुरक्षा योजना अधिक मजबूत करणे हा आहे.

काय आहेत हे चार नवे लेबर कोड?

नवीन नियमांमध्ये खालील चार महत्त्वाच्या संहितांचा समावेश आहे:

  1. वेजेस कोड 2019
  2. इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020
  3. सोशल सिक्युरिटी कोड 2020.
  4. ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन्स कोड 2020

या चार कोडमुळे 29 जुने श्रम कायदे एकत्रित करून सुलभ, आधुनिक आणि पारदर्शी करण्यात आले आहेत.

हे ही वाचा… पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज! 45 किमी भूमिगत रस्ता वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय.

नव्या लेबर कोडनुसार सॅलरीमध्ये मोठा बदल. New Labour Codes

नव्या वेजेस कोडनुसार आता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या एकूण पगारातील किमान 50% रक्कम ही बेसिक सॅलरी असणे बंधनकारक आहे.

Read more...  तुम्ही घर किंवा दुकानाचे कर्ज घेताना या सहा चुका केल्या, तर तुम्ही अडचणीत येताल. Home Loan update

याचा नेमका परिणाम असा होईल:

✔ PF मध्ये रक्कम वाढेल
✔ ग्रॅच्युइटीची गणना वाढेल
✔ रिटायरमेंटनंतर मिळणारे फायदे मोठे होतील

परंतु

❗ हातात मिळणारा पगार (Take-Home Salary) कमी होण्याची शक्यता
कारण CTC तसाच राहील, पण PF आणि ग्रॅच्युइटीचा वाटा वाढेल.

कंपन्यांना पगार स्ट्रक्चर बदलणे आता अनिवार्य. New Labour Codes

सरकारने नियम लागू केल्यानंतर 45 दिवसांत अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर देशातील सर्व कंपन्यांना नवीन वेतन संरचना लागू करावी लागेल.

हे ही वाचा…ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन भेट मिळणार, ६०, ७० आणि ७५+ वयोगटातील नागरिकांसाठी मोठी बातमी. 

हा नियम का आणला गेला?

अनेक कंपन्या बेसिक सॅलरी कमी ठेवून पगाराचा मोठा भाग भत्त्यांच्या स्वरूपात देत असत, ज्यामुळे त्यांना PF व ग्रॅच्युइटीवरील खर्च कमी पडत असे.

सरकारने हा अवलंब टाळण्यासाठी बेसिक सॅलरीची मर्यादा निश्चित केली आहे, ज्यामुळे कर्मचारी सामाजिक सुरक्षेत अधिक संरक्षित राहतील.

Read more...  कोण आहेत स्मृती मंधाना? का आहेत चर्चेत, Smriti Mandhana Biography

तज्ज्ञांचे मत काय? New Labour Codes

सुचिता दत्ता (Indian Staffing Federation) यांचे म्हणणे:

वेजेस कोड आणि सोशल सिक्युरिटी कोडमध्ये वेतनाची व्याख्या समान केली आहे

  1. PF आणि ग्रॅच्युइटी अधिक मजबूत होणार.
  2. भत्त्यांमध्ये कपात झाल्यास टेक-होम सॅलरी कमी होण्याची शक्यता.
  3. अंजली मल्होत्रा (नांगिया ग्रुप) यांचे मत:
  4. वेजेसमध्ये बेसिक, डीए आणि रिटेनिंग अलाउन्सचा समावेश.
  5. एकूण उत्पन्नातील किमान 50% भाग वेजेस म्हणून गृहित.
  6. पगार, पेंशन, ग्रॅच्युइटी अधिक पारदर्शक आणि सोपे.

आधी काय होतं? आणि आता काय बदलणार?

पूर्वीचे मॉडेल

  • बेसिक सॅलरी कमी.
  • भत्ते जास्त .
  • PF आणि ग्रॅच्युइटी कमी.
  • आताचे नवीन मॉडेल
  • CTC च्या किमान 50% बेसिक सॅलरी
  • PF आणि ग्रॅच्युइटी वाढ.
  • रिटायरमेंट फंड अधिक मजबूत
  • टेक-होम पगार काही प्रमाणात कमी

नवीन लेबर कोडमुळे कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणखी मजबूत होत आहे. PF, ग्रॅच्युइटी आणि सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये वाढ होणे दीर्घकालीन दृष्टिकोनातून कर्मचार्‍यांच्या फायद्याचे ठरेल.

Leave a Comment