अखेर DA वाढला, राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, इतका झाला महागाई भत्ता. DA Hike Allowance

Created by satish, 23 November 2025

DA Hike Allowance :- नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि निवृत्तीधारकांसाठी महागाई भरपाई (DR) मध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सुधारित दर 1 जुलै 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारच्या निर्णयानुसार, वाढीनंतर महागाई भत्ता 58 टक्के इतका होणार आहे.

👉आठव्या वेतन आयोगाला मंजुरी 👈

🔵कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना मोठा दिलासा

या वाढीचा थेट फायदा सुमारे 49.19 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.72 लाख निवृत्तीधारकांना होणार आहे. यामुळे केंद्राच्या तिजोरीवर 10,083.96 कोटी रुपये इतका अतिरिक्त भार पडणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

महागाई भत्ता आणि महागाई भरपाई वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार केली जाते. दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये महागाईदराच्या आधारे या भत्त्याचा फेरआढावा घेतला जातो. Employees update

जुलै ते सप्टेंबर या महिन्यांचे वाढीव भत्ते ऑक्टोबर महिन्याच्या पगारासह कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Read more...  जेष्ठ नागरिकांना रेल्वे मध्ये परत सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Indian railway

🔵महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम राज्य कर्मचारीवर्गावरही होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारही राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महामंडळ कर्मचारी तसेच निवृत्तीधारकांसाठी हीच वाढ लागू करण्याच्या तयारीत आहे.employees da hike

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होण्याची शक्यता असून, याच बैठकीत महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबतची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment